You are currently viewing तर कान पकडा, पण जिल्ह्याच्या विकासासाठी एकञ काम करूया”… नामदार नितेश राणे

तर कान पकडा, पण जिल्ह्याच्या विकासासाठी एकञ काम करूया”… नामदार नितेश राणे

“शतर कान पकडा, पण जिल्ह्याच्या विकासासाठी एकञ काम करूया”… नामदार नितेश राणे

आज तरूण भारतचा १०५ वा वर्धापनदिन कुडाळ येथे संपन्न झाला. अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आमदार निलेश राणे यांनी नेहमी प्रमाणे कोपरखळ्या मारून कार्यक्रमाला रंगत आणली. काही महनीय निमंत्रित उशिरा आले ते जेंव्हा येत होते तेव्हा आमदार निलेश राणे संबोधित करत होते त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचे शब्दसुमनानी ते स्वागत करत होते.. आणि पुढे असही म्हणत होते की मी आयोजकाच्याच भूमिकेत आहे.
शेवटी समारोपाचं संबोधन नामदार नितेश राणे यांच होत. अतिशय शांतपणे ते आपली भूमिका मांडत होते. अतिशयोक्ती वाटेल पण या जिल्ह्यात आतापर्यंत राज्यस्तरावर ज्या अनेकांनी महाराष्ट्राचं या जिल्ह्याचा मंत्री म्हणून भूमिका मांडल्या पण आज नितेश राणेनी ज्या पद्धतीने मांडणी केली ती खरोखरच अचंबित करणारी होती. तब्बल वीस मिनिटांचं संबोधन ऐकताना सुरूवातीला हे नितेश राणेचं बोलत आहेत का ❓ हा मला प्रश्न पडला. विरोधकांवर कोणत्याही प्रकारची टिका न करता मला हा या महाराष्ट्रातील एक नंबरचा जिल्हा घडवायचा आहे त्यासाठी या जिल्ह्यातील प्रत्येक समाज घटकांचं सहकार्य आणि सुसंवाद मला अभिप्रेत आहे. होय या पूर्वी आमच्या कडून काही चुका झाल्या असतील.. पण आज मी तुम्हांला शब्द देतो या जिल्ह्यातील जनतेला आमच्या कडून अभिप्रेत आहे तेच घडणार. अधिकाऱ्यांनी जनतेचे आपण सेवक आहात याचं भान ठेवून जबाबदारीनं काम केल पाहिजे. याबाबतीत कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही अशीही तंबी दिली.
आजचं नितेशजींच सयंमी आणि आश्वासक रूप मी यापूर्वी कधीच पाहिलं नाही. आपण महाराष्ट्राचा एक जबाबदार मंत्री आहोत. या जिल्ह्यातीलच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनता आपल्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने आणि आशेने पहात आहे याची जाणीव नितेशजीना निश्चितच झालेली आहे. याचं प्रतिबिंब आज त्यांच्या संबोधनात अनुभवायला मिळाल. नामदार नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून जर पुढचा पाच वर्षाचा मंञी म्हणून प्रवास केला तर मला वाटत, पुढची किमान पंचवीस वर्षे या जिल्ह्यात राजकीय स्पेस निर्माण होणे कठीण आहे. चुकणे हा मनुष्य स्वभाव आहे पण चुकीचे आकलन झाल्यावर त्यामध्ये बदल करणे हे महत्त्वाचे असते. मला वाटत जेव्हा नितेशजी असं आवाहन करतात की काही चुकलं तर कान पकडा पण विकासासाठी साथ द्या. त्यांच्या या भूमिकेतून हे स्पष्ट होत की नितेशजी खूप खूप बदलले.. आणि त्यांचा हा सकारात्मक बदल त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी निश्चितच आशादायी आहे. जसा तो वैयक्तिक रित्या त्यांच्यासाठी लाभदायी आहे तसाच तो या जिल्ह्याच्या विकासासाठी पण आशादायी आहे.
कार्यक्रम संपल्यावर जेव्हा मी व्यासपीठावर त्याना भेटायला गेलो, तेव्हा ते म्हणाले ” मी मंञी झाल्यावर पहिल्यांदाच भेटता.. पुढच वाक्य मला आणखीन अचंबित करणारं होत,.. पार्सेकरजी तुमचं मार्गदर्शन पाहिजे.. मी नम्रपणे त्याना प्रतिसाद दिला, या जिल्ह्यात तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे रचनात्मक काम कराल त्यासाठी सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत… पुढं मी म्हणालो, नितेशजी आम्हांला कुडाळ एम्. आय्. डि. सी. च्या काही प्रलंबित समस्या बाबत तुमचा अर्धा तास पाहिजे.. निश्चित. अर्धा का आपण एक तासाची बैठक करु…
नितेशजी, आज तुम्ही जी भूमिका मांडली त्यानुसार मार्गक्रमण केलत तर शिव छञपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीवर जाईल… आणि यासाठीच या जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला मनापासून शुभेच्छा!
.. शुभेच्छुक- अॅड. नकुल पार्सेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा