You are currently viewing स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जाने.2025 ला पणजी गोवा येथे साजरी होणार जयंती

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जाने.2025 ला पणजी गोवा येथे साजरी होणार जयंती

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जाने.2025 ला पणजी गोवा येथे साजरी होणार जयंती

विविध मान्यवर राहणार उपस्थित

गोवा

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जाने.2025 ला पणजी गोवा येथे जयंती, विविध मान्यवर उपस्थित राहणार
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,भारताची प्रथम शिक्षिका,राष्ट्रमाता- सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीचे मल्टी पर्पज हॉल,कला संचालनालय पाटो,पणजी -गोवा येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळ- गोवा व कला आणि सांस्कृती संचालनालय -गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येत असून त्या कार्यक्रमात दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती – सौ.ज्योती रमाकांत जाधव ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख वक्त्या म्हणून भारत मुक्ती महिला मोर्चा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा -ॲड.माया जमदाडे,खास पाहूणे-कामगार कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या रिजीनल डायरेक्टर -मा.अरूणा विष्णू वाघ,भारत मुक्ती मोर्चा राज्य अध्यक्ष -मा.जनार्दन ताम्हणकर,कला आणि सांस्कृती संचालनालय गोवा सरकारचे उप संचालक -मा.मिलींद माटे,भारतीय बौद्ध महासभा गोवा शाखेचे अध्यक्ष -मा.एस.के.जाधव,विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा चे अध्यक्ष -मा.सतीश कोरगावकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा -सावित्री बाई फुले महिला मंडळ गोवा च्या अध्यक्षा -मा.वासंती दत्ताराम परवार ह्या असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा