आरपीडी हायस्कूलचे २७, २८ रोजी स्नेहसंमेलन
सावंतवाडी
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ व २८ डिसेंबर रोजी होणार आहे. २७ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी अडीच वाजता शेला पागोटे कार्यक्रम, दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. शनिवार २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष, सर्व संचालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.