You are currently viewing मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे आमदारांचा नागरिक सत्कार लांबणीवर

मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे आमदारांचा नागरिक सत्कार लांबणीवर

सावंतवाडी :

महायुतीतर्फे सावंतवाडी येथे उद्या 25 डिसेंबर रोजी होणारा तिन्ही आमदारांचा नागरिक सत्कार कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली आहे.

सावंतवाडीत जगन्नाथ भोसले शिवउद्यान येथे उद्या 25 डिसेंबर रोजी महायुतीतर्फे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र बुधवारी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक असल्यामुळे हा कार्यक्रम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे नवीन दिवस व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा