You are currently viewing आंबोली सैनिक स्कूलचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात

आंबोली सैनिक स्कूलचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात

आंबोली सैनिक स्कूलचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात

लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलीक व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक मा. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व कर्मचारी यांचा सत्कार व शाळेच्या ‘वेध’ वार्षिक विशेषाकांचे प्रकाशन!*

आंबोली :

आंबोली येथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा 21 वा वर्धापन दिन दिनांक 22 व 23 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलीक 58 महा. एन.सी.सी. बटालियन यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाला. दि. 22 डिसेंबर 2024 रोजी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलीक, सुभेदार कृपाशंकर 58 एन.सी.सी. बटालियन, कार्यकारी अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ, सरपंच सौ. सावित्री पालयेकर, संचालक जाॅय डॉन्टस सैनिक पतपेढी चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, संचालक श्री. राजाराम वळंजू, ऑफिस सेक्रेटरी दिपक राऊळ यांच्या उपस्थितीत गुणवंत कर्मचारी व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी सांस्कृतिक व बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. मराठी व हिंदी गीतांवर विविध नृत्य प्रकार सादर केले. शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील नाटिकेने वातावरण भारून गेले. श्रीराम चरित्रावर आधारित नाटिकेने सर्वांची मने जिंकली. बालकलाकारांनी सादर केलेल्या दशावतारी नाटिकेने कार्यक्रमात रंगत आणली. हा कार्यक्रम दिग्दर्शित केलेल्या श्री. ऋषिकेश गावडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कॅडेट रितेश हरमलकर, अथर्व पालव, आदित्य घाडी या बालचित्रकारांनी रेखाटलेल्या शिवाजी महाराजांच्या चित्राचे अनावरण प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलीक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वर्षभरात विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व शिक्षक व संस्था कर्मचाऱ्यांना शाळेचे स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यकारी अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर बेस्ट टीचर्स श्री.ऋषिकेश गावडे, श्री.
अरुण गावडे, श्री. मायाप्पा शिंदे, श्री.नागेश पांढरे, शिक्षण निदेशक श्री. शिवराज पवार, श्री. जयराम कोळी,क्रीडा शिक्षक श्री. सतीश आईर,हेडकुक श्री. आनंद कुडतरकर, श्री.रवी गवस, श्री श्याम गावडे इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता 6 वी प्रथम क्रमांक कॅडेट गौरांग पेडणेकर, इयत्ता 7 वी कॅडेट देवेश परब, इयत्ता 8 वी कॅडेट पार्थ सांडव, इयत्ता 9 वी नील हेगीष्टे इयत्ता 11 वी कॅडेट तनुष राऊत या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल, शालेय हॉकी, जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप, नेहरू कप फुटबॉल स्पर्धा, जिल्हास्तरीय जुदो, बुद्धिबळ, कुस्ती, कॅरम, ॲथलेटिक्स स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंचा लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री ऋषिकेश गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक मा. सौरभ कुमार अग्रवाल यांचे सैनिक स्कूलच्या आवारात आगमन झाले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलाजच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती प्रमुख पाहुण्यांना करून दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे आगमन सैनिक स्कूलच्या संचलन मैदानावर झाले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना देऊन उत्कृष्ट सैनिक संचालन सादर केले. त्यानंतर छोट्या सैनिकांनी लाठीकाठी, झांज प्रात्यक्षिक, जुदो,कराटे, मल्लखांब, लेझिम,व्हॅलीक्रॉसिंग व ऑबस्टॅकल्स इ. विविध मैदानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली. या साहसी प्रात्यक्षिकांनी प्रमुख अतिथी व पालकांची मने जिंकली.
सर्व मान्यवरांचे शाळेचे प्राचार्य नितीन गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेचा वार्षिक विशेषांक ‘वेध’ चे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिस वितरणामध्ये शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये एमएच-सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कॅडेट प्रसाद मेस्त्री, कॅडेट अलेक्स सावंत तसेच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा प्रथम क्रमांक प्राप्त कॅडेट गिरीराज मुंडले, द्वितीय क्रमांक कॅडेट सोहम बोरहाडे, तृतीय क्रमांक रितेश हरमलकर, इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा प्रथम क्रमांक प्राप्त कॅडेट एलेक्स सावंत, द्वितीय क्रमांक कॅडेट अजय गावकर, तृतीय क्रमांक कॅडेट सुयश कदम ऑलंपियाड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा पातळीवरील गुणवंत धावपटू यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय हॅकेथाॅन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बेस्ट हाऊस इन अकॅडेमिक्स विशालगड हाऊस, बेस्ट हाऊस इन स्पोर्ट्स रायगड हाऊस, बेस्ट हाऊस इन को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सिंहगड हाऊस, चॅम्पियन हाऊस ऑफ द इयर म्हणून रायगड हाऊसची निवड करण्यात आली. तसेच बेस्ट कॅडेट म्हणून कॅडेट तनुष राऊत व बेस्ट स्पोर्ट्स मन म्हणून कॅडेट अथर्व निल्ले यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. सौरभ कुमार अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सैनिक स्कूलच्या भौतिक सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण व्हावे असे आवाहन केले. दिवसभर ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत.
यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशिक्षकांनी किती परिश्रम घेतले असतील याची प्रचिती येते. या शाळेने आपला गुणवंत विद्यार्थी सर्व गुणसंपन्न करण्याचा संकल्प केलेला
आहे असे दिसून येते. सैन्य सेवेत योगदान देऊन आता सैनिक स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करणाऱ्या माजी सैनिकांचे त्यांनी कौतुक केले. समाजातील वातावरण पाहता युवा पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडे मैदानातील कौशल्याबरोबरच शारीरिक संपदा संपन्न असल्याचे सांगितले. सैनिक स्कूलच्या रचनात्मक शैक्षणिक कार्यात पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते सहाय्य केले जाईल, असे प्रतिपादन केले. अल्पावधीत या शाळेने उंच झेप घेतली आहे याचा शाळेतील विद्यार्थी व पालिकांना अभिमान असायला हवा. संबंधित शिक्षक आणि पालक वर्ग या सर्वांचे योगदान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
सैनिक स्कूलचे संस्था कार्यकारी अध्यक्ष मा. सुनील राऊळ म्हणाले जास्तीत जास्त मुलांचे भवितव्य घडवण्याचे महान कार्य या सैनिक स्कूलच्या माध्यमातून होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सैनिक स्कूलचा विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहे. 10 वी 12 वीच्या शालांत परीक्षेमध्ये सैनिक स्कूलचा निकाल 100 टक्के लागतो याचे श्रेय सर्व शिक्षकांना जाते. या शाळेमधून देश सेवेसाठी मोठ्या प्रमाणात सैन्य अधिकारी होण्यासाठी एन.डी.ए. परीक्षा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले पाहिजेत. या वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन संस्थेने संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पारितोषिक प्राप्त केले.
राज्यातील सैनिक स्कूल मधून विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व्हावा यासाठी शासनाने स्थापन केलेल्या कमिटीच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राष्ट्रभक्तीची संस्कृती शिवरायांच्या प्रेरणेने रुजावी. सैनिक स्कूल मधून योद्धे बनावेत, असा आशावाद व्यक्त केला.
आभार प्रदर्शन प्राचार्य नितीन गावडे यांनी केले. इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांनी ऑबस्टॅकल्स प्रात्यक्षिके सादर केली. सूत्रसंचालन श्री ऋषिकेश गावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री.सुनील राऊळ, संचालक ऑ. कॅप्टन श्री. दिनानाथ सावंत श्री. जॉय डॉन्टस, श्री. राजाराम वळंजू, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, ऑ. कॅप्टन श्री. सुभाष सावंत, कार्यालयीन सचिव श्री.दिपक राऊळ, श्री श्रीकांत गावडे प्रमुख गावकर, सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे, चौकुळ माजी सैनिक श्री. बापू गावडे सैनिक स्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. सुरेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय नार्वेकर, पालक प्रतिनिधी श्री. संजय गावडे, सौ. संजना पेडणेकर, सौ. कीर्ती समजिस्कर, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अभिजीत जाधव पत्रकार श्री. विजय राऊत, श्री. अनिल चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आंबोली ग्रामस्थ, समस्त पालक वर्ग व पंचक्रोशीतील आजीमाजी सैनिक बांधव व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा