वेंगुर्ले पोलिसांकडून सायबर फ्रॉड, ‘डायल ११२’बाबत मार्गदर्शन
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेला व शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सायबर फ्रॉड, नशामुक्ती व डायल ११२ यावर जनजागृतीचे कार्यक्रम वेंगुर्ले तालुका पोलीस स्टेशनमार्फत युद्धपातळीवर सुरू आहेत.
वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस रंजिता चौहान, सावी पाटील, ट्रफिक पोलीस मनोज परुळेकर हे शहर व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये सायबर फ्रॉड, नशामुक्ती, डायल ११२’ बाबत मार्गदर्शन केले जात आहे. येथील न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयातही हा कार्यक्रम घेण्यात आला. यात शाळेतील अल्पवयीन मुलांशी संवाद साधून त्यांना आयुष्य म्हणजे काय? ते कसे जगावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पहिला पोलीस रंजिता चौहान यांनी, अल्पवयीन मुलींसाठी त्यांच्या आई वडीलांना नजरेसमोर ठेवून त्यांनी स्वतः लिहीलेली ‘कधीतरी त्यांच्यासाठी जगुन बघ ना’ या कवितेतून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, सौ. मोहिते, सौ. भिसे, सौ. कुबल, श्री. बोडेकर, लिपिक अजित केरकर आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले.