You are currently viewing पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम

पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम

*पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम*

पिंपरी
निवेदन क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे, मराठीतील पहिले व्यावसायिक निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सत्कार समारंभ बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
कलारंजन प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रसिद्ध कथकगुरू व संस्कार भारतीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कपोते यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

सत्कारानंतर ‘पन्नास वर्षांतील सांस्कृतिक संचित’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील आठवणी, किस्से गाडगीळ यांच्याकडून ऐकायला मिळणार आहेत. सदर कार्यक्रम चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममधील शाहीर योगेश सभागृहात होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी दिली आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा