You are currently viewing वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव काळे सर यांचा भाजपा च्या वतीने सत्कार

वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव काळे सर यांचा भाजपा च्या वतीने सत्कार

*वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव काळे सर यांचा भाजपा च्या वतीने सत्कार*

जेष्ठ नागरिक संघ , वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी वेंगुर्ले हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक शामराव काळे सर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला .
जेष्ठ नागरिक संघ , वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी रा.पा.जोशी सर होते , परंतु वयोमानानुसार त्यांनी पदमुक्त होत नविन अध्यक्ष निवडण्याची ईच्छा व्यक्त केली . त्यानुसार शामराव काळे सरांची एकमताने निवड करण्यात आली . तालुक्यातील ४०० सदस्य असलेल्या जेष्ठ नागरिक संघाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत .
शामराव काळे सरांनी ३६ वर्षे वेंगुर्ले हायस्कूल मध्ये सेवा बजावली. त्यापैकी २ वर्षे सुपरवायझर व १४ वर्षे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कामगिरी केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत वेंगुर्ले हायस्कूल चे नाव जिल्ह्यात रोशन केले . आता सेवानिवृत्ती नंतर संस्थेने त्यांच्यावर कोल्हापूर चर्च कौन्सिलचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे .
नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , नगरसेवक प्रशांत आपटे , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा