वेंगुर्ला नगरपरिषदेस GIZ प्रतिनिधींचा अभ्यास दौरा
वेंगुर्ला शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरणीय उपक्रमांची केली प्रशंसा
वेंगुर्ला
पर्यावरण मंत्रालय आणि हवामान बदल विभाग, महाराष्ट्र शासन व GIZ यांच्या संयुक्त विद्यमाने नगर वन/नगर वाटिका योजना आणि एकल वापर प्लास्टिक बंदी उपक्रमांअंतर्गत “हवामान सह-लाभांचे” मूल्यांकन पद्धत विकसित करण्यासाठी तसेच वेंगुर्ला शहरातील एकल वापर प्लास्टिक बंदी अभ्यास करण्यासाठी GIZ संस्थेच्या प्रतिनिधींनी दिनांक ११ डिसेंबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट दिली. तीनदिवसीय अभ्यास दौऱ्यामध्ये प्रतिनिधी श्री. गौरव सहानी, श्रीम.प्रियांका सिंग आणि श्रीम.ऐश्वर्या जैन यांनी वेंगुर्ला शहरातील स्वच्छतेसंबंधी विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी वेंगुर्ला शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरणीय उपक्रमांची प्रशंसा करताना शून्य कचरा मॉडेलच्या प्रभावी अंमलबजावणीचे त्यांनी कौतुक केले. वेंगुर्ला शहराचे हे मॉडेल देशभर राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत वेंगुर्ला शहराने पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनामध्ये दाखवलेले नवोन्मेष इतर शहरांसाठी आदर्श ठरू शकते, असे प्रतिपादन देखील त्यांनी केले .