राज्यात पहिली लस घेण्याचा मान सिंधुदुर्गकन्येला!

राज्यात पहिली लस घेण्याचा मान सिंधुदुर्गकन्येला!

मालवण
कोरोना विरोधातील लढाईचा मुख्य टप्पा असलेल्या लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी एकाच दिवशी देशात सर्वत्र सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये राज्यातील कोविड लसीकरणास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला असून पहिली लस टोचून घेण्याचा बहुमान सौ. मधुरा अवसरे-पाटील हिला मिळाला आहे.

मधुरा ही मालवणची सुकन्या असून ती मुंबईत वास्तव्यास आहे. पाच वर्षांपासून ती मुंबईतील बीकेसी सेंटरमधील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर मागील पाच महिने ती बीकेसीत कोविड सेंटरमध्ये कोविड रुग्णांची सेवा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात कोरोना विरोधातील लढाई सुरू असून भारताने स्वतःची कोरोनाची लस निर्मिती केली आहे. या लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी देशात एकाच वेळी करण्यात आला. मुंबईतील बीकेसी कोविड सेंटर मध्ये राज्यातील लसीकरणाचा शुभारंभ झाला असून यामध्ये मधुरा अवसरे- पाटील हिला राज्यात सर्वप्रथम कोविड लस देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा