मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज…

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज…

सोमवारी होणार फैसला

सावंतवाडी

तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी प्रकियेला सोमवारी सकाळी १० वाजता सुरूवात होणार असून दोन टप्प्यांत ही मतमोजणी होणार आहे.

पहिल्या टप्प्यात मळगाव, तळवडे, इन्सुली, आरोस, कोलगाव, डिंगणे या सहा ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तर दुसऱ्या फेरीत आंबोली, मळेवाड, चौकुळ, आरोंदा, दांडेली या पाच ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. २६५ उमेदवारांच मतपेटीत बंद असलेल भवितव्य सोमवारी समोर येणार असल्यानं उमेदवारांची घालमेल वाढली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा