You are currently viewing दोडामार्गात तीन ग्रामपंचायतींच्या अर्ज सादर करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत वाढ..

दोडामार्गात तीन ग्रामपंचायतींच्या अर्ज सादर करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत वाढ..

तीन ग्रामपंचायतींना अर्ज सादर करण्यासाठी ऑफलाईनही मुभा

दोडामार्ग

तालुक्यातील कुडासे, तेरवण – मेढे, आयनोडे – हेवाळे या तीन ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणुक प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून काही महत्वपूर्ण बदल केले असून त्याचा उमेदवारानी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार अरुण खानोलकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून काही बदल करणयात आलेले आहेत.

त्यामध्ये उमेदवाराना ऑनलाईन अर्ज सुविधेबरोबर कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करता येईल. महत्वाचे म्हणजे बुधवारी दुपारपर्यंत असणारी सादरीकरण मुदत सायंकाळी ५. ३० वा. पर्यंत वाढवली आहे अशी माहिती तहसीलदार खानोलकर यांनी दिली.

तसेच अद्यापपर्यंत आयनोडे – हेवाळे – (1), तेरवण – मेढे (३), कुडासे (5) असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + thirteen =