You are currently viewing विजघर केंद्रे तिलारी प्रकल्पग्रस्तांचे प्राणांतिक उपोषण सुरू

विजघर केंद्रे तिलारी प्रकल्पग्रस्तांचे प्राणांतिक उपोषण सुरू

एक रक्कमी अनुदानापासून अनेक वर्षे वंचित ठेवल्याने आंदोलनाचा निर्णय

दोडामार्ग

विजघर केंद्रे बुद्रुक येथील काही तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांना एक रक्कमी अनुदानापासून वेळोवेळी पाठपुरावा करूनही अनेक वर्षे वंचित ठेवल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पासून येथील मंदिरात प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे.

या उपोषणात संजय नारायण नाईक, प्रकाश तुकाराम गावडे, कृष्णा लिंगो हरिजन, लवू रामा गावडे, भरत तुकाराम गावडे, अमर सुभाष जाधव, विजय तारक कांबळे सर्व अर्जदार तसेच केंद्रे बुद्रुक ग्रामस्थ या उपोषणास सहभागी झाले आहेत. याविषयी यापूर्वी अनेकदा उपोषण करण्यात आले मात्र प्रत्येक वेळी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले होते स्थगित करण्यात आले मात्र हा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागला नाही त्यामुळे पुन्हा एकदा ह्या सर्वांनी येथील मंदिरात प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे.


या चालू वर्षात दोन वेळा उपोषणे केली यावेळी शासन प्रतिनिधीनी लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित करून त्या प्राप्त स्थितीत शासनास सहकार्य केले होते माञ हा विषय मार्गी न लागल्याने आता सहनशिलतेचा अंत झाल्यामुळे वरील विषयास अनुसरून आम्ही टोकाची भूमिका घेत आहोत यामध्ये जीवितास धोका निर्माण झाल्यास शासन प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील तसेच या उपोषणाची तात्काळ योग्य ती दखल न घेतल्यास उपोषणाचे रूपांतर जलसमाधी मध्ये होऊ शकते असा इशारा उपोषणकर्त्यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 18 =