You are currently viewing ||तूचि दिगंबर||

||तूचि दिगंबर||

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम गीत रचना*

 

*||तूचि दिगंबर||*

 

तूचि दिगंबर दत्तात्रेया चित्रांबर तू हृदयी वसतो

तुझ्या कृपेचा आशिष राहो हीच प्रार्थना चरणी करतो ||धृ||

 

नयनी माझ्या तुझीच मूर्ती

तुझ्या दर्शने मिळते स्फूर्ती

आरती तुझी कर्णी पडता पाय मंदिरी सहजी वळतो ||१||

 

औदुंबर रुपि त्वं तत्व वसे

वेद चारही श्र्वानरुप बसे

प्रदक्षिणा ती मारीता वृक्षा प्रसन्न भाव अंतरी स्फुरतो ||२||

 

चरणी तुझ्या माथा टेकता

कळले मं मी नाही एकटा

अद्भुत शक्ती तुझिया ठायी तरतो तोचि तुजला भजतो ||३||

 

✒️ दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा