You are currently viewing १७ डिसेंबर मंगळवारी इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

१७ डिसेंबर मंगळवारी इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी  :

 

इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने मंगळवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी विधिवत पुजा, त्यानंतर ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे तसेच रात्री पालखी फेरी व त्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तसेच दुपारी १२ वाजता श्री देवी माऊली दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. जत्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन इन्सुली ग्रामस्थ, श्री देवी माऊली देवस्थान समिती व मानकरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा