शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला कायदा मागे घेण्याची मागणी…
सावंतवाडी
शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतक-याला मारक ठरणारा हा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.