You are currently viewing जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता

जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी सलग्न महाविद्यालयातील वर्ग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व संबंधित अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड – 19 चाचणी करणे आवश्यक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता विधान संहिता कलम 188,269,270,271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील असे आदेश शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकार तथा सचिव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =