You are currently viewing १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान

१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली माहिती

सिंधुदुर्गनगरी

वाहन चालकांसह नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. या कालावधीत वाहन चालक, नागरिक यांच्यामध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाते. शाळा महविद्यालयांमध्ये जनजागृती पर कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी राबविण्यात येणारे ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान १५ जानेवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यावेळी रस्त्यावर वाहन चालकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी माहिती पत्रक पुस्तके वाटप केली जाणार आहेत. दरवर्षी शाळा महाविदयालयामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत होते. मात्र कोरोना कालावधी मध्ये हा कार्यक्रम शाळा कॉलेज मध्ये घेतला जाणार नाही. तसेच या वेळी रस्त्यावर वाहन चालकानान मार्गदर्शन करणे तसेच ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत भर दिला जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 1 =