You are currently viewing आदर्श गांव केर येथे भारतीय सैन्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

आदर्श गांव केर येथे भारतीय सैन्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

दोडामार्ग
आदर्श गांव केर येथे भारतीय सैन्य दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला व केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.
केर चव्हाटा मंदीर येथे हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी सध्या देशसेवा बजावणारे मोहन देसाई, रोहन केरकर आणि माजी सैनिक नारायण देसाई, भिकाजी देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास  प्रकाश देसाई, महादेव देसाई, शंकर देसाई, संतोष देसाई, समीर देसाई, तुषार तु. देसाई, उदय देसाई, जगदीश नाईक, अमित राऊत, नितीन देसाई, विश्वास देसाई, स्वप्नील देसाई, सिद्धेश देसाई, तेजस देसाई, मंगेश देसाई, ओमकार देसाई, सदा देसाई, नीनाद देसाई, प्रशांत देसाई, गंगाराम देसाई, निखिल देसाई, तुषार वा. देसाई, विनायक देसाई, कृष्णा देसाई, रमेश देसाई, संजु देसाई  आदी सह युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी मोहन देसाई, रोहन केरकर आणि नारायण देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. गावाने या कार्यक्रमातून आपला केलेला सन्मान तमाम सैनिकांचा आहे. गावाचा आपणाला अभिमान आहे. गावविकासात आपले नेहमी योगदान असेल असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =