*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”संहिता संकेत”*
सारे विश्व चालते संकेत मार्गा वरून
संहिता अस्मिता सांभाळावी स्थिती प्रमाणंIIधृII
आव्हान पेलताना विश्व घ्यावे समजून
दुनिया चालते अंतस्थ मन संकेतानं
सत्य संकेतानी केलेले असते सुचितII1II
शाश्वतता टिकते आचार संहितेतून
संहितेने होई मनुष्याचे सुकर जीवन
संहिता सर्वांनी जपायची असते मनानंII2II
चरक कश्यप दंड संहिता सर्वज्ञात
माहिती कौशल्य विद्वान संहिता होत
चार वेद संहिता संरचित संयोजनII3II
विज्ञान अनेक संहिता होत वस्तुपाठ
वैदिक संहिता कायदा संहिता शास्त्र
मनुष्य होतो संयमानं सृजन सज्ञानII4II
ऋषी संहिता हे ईश्वराचे अमूल्य देणं
संहिता हे वेदांचे स्वरूप आहे प्राचीन
मर्यादा समजून वागणं शास्त्र नियमानंII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.