You are currently viewing शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी हरकती व आक्षेपांची नोंदणी करावी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी हरकती व आक्षेपांची नोंदणी करावी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी हरकती व आक्षेपांची नोंदणी करावी

सिंधुदुर्गनगरी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या वर्षाच्या हरकती व आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्यानुसार  दि. 13 ते 15 एप्रिल 2023 पर्यंत https://sports.maharashtra.gov.in या संकेस्थस्थळावर हरकती व आक्षेपांची नोंदणी करावी, असे आवाहन‍ जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

            क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत “शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार”, “उत्कृष्ट क्रीडामार्गदर्शक पुरस्कार “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)”, “शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)” असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “पुरस्कार (Award)” टॅब मध्ये दि. 13 ते 15 एप्रिल२०२३ या कालावधीपर्यंत प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यात नमूद केलेल्या माहिती संदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि. 13 ते 15 एप्रिल 2023 या कालावधीपर्यंत संचालनालयाच्या desk१४.dsys-mh@gov.in या ई-मेल आयडीवर विहित नमुन्यात कळविण्यात यावे. विहित नमुना संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या (Latest News) मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडापुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या आक्षेप, हरकतींचे निराकरण/ स्पष्टीकरण दि. 15 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीत संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “पुरस्कार (Award) टॅबमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा