भारत होईल टी बी मुक्त :”१०० दिवस टी बी मुक्त भारतासाठी” आभियानाचा दोडामार्ग मध्ये शुभारंभ*
*आता रुग्णांच्या होणार सगळ्या तपासण्या : वैद्यकीय अधीक्षक आकाश एडके यांचे सहकार्याचे आवाहन*
*दोडामार्ग,:*
शासनामार्फत टी बी रोगापासुन मुक्ती साठी अनेक उपाय योजना करण्यात आला त्यातून हा रोग आटोक्यात आला. मात्र आता देशातून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने “१०० दिवस ति बी मुक्त भारतासाठी” हे विशेष अभियान सुरु केले आहे. या आभियाना अंतर्गत जो रुग्ण रुग्णालयात उपचाराला येईल, ज्याला बी पी अस्थामा डायबिटीस असे आजार असतील त्याची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना टीबी विषयी कोणती लक्षणे आहेत हेही कळणार आहे, टी बी चे विषाणु अगदी शेवटच्या क्षणी लक्षात येतात त्यामुळे रुग्ण घाबरतो त्या पासून तो वाचावा यासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाने त्यांची तपासणी होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आकाश एडके यांनी केले. ते दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आयोजित “१०० दिवस टी बी मुक्त भारतासाठी” यां अभियानाच्या उदघाट्न कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास रेडकर यांनी सदर आभियांनात विविध वैद्यकीय सेवा लोकांना मिळणार असून शासनाचा या आभियांनात साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. आकाश एडके, डॉ रामदास रेडकर, डॉ. क्रांती बारस्कर, डॉ. अनिकेत गुरव, डॉ. अभय साळुंके, डॉ. लक्ष्मण मयकवाड, प्रयोग शाळा प्रमुख संजय नाटेकर, ज्येष्ठ परिचारिका सौ. सुरेखा भणगे तसेच रुग्णालयीन स्टाफ आणि रुग्ण उपस्थित होते.
👉👉 *पहा अधिक बातमी* 👉👉
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
Call On :
9765446118