You are currently viewing सातारा जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी वर्गाची बांदा केंद्रशाळेला भेट

सातारा जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी वर्गाची बांदा केंद्रशाळेला भेट

*सातारा जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी वर्गाची बांदा केंद्रशाळेला भेट*

*बांदा*

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अन्वये निपुण भारत कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राथमिक स्तरावर राबविण्यात येत आहे . सिंधुदुर्ग जिल्हा हा अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असलेल्या पीएम श्री जिल्हा परिषद बांदा केंद्र शाळेला सातारा येथील उपशिक्षणाधिकारी श्री रवींद्र खंदारे यांच्यासह शिक्षक क्षेत्रातील अधिकारी यांनी भेट देऊन बांदा केंद्रशाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती करून‌ घेतली. बांदा केंद्र शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकसहभाग, विद्यार्थ्यांचे सादरीकरण यांची पाहणी केली. यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री रवींद्र खंदारे यांनी बांदा केंद्र शाळेत राबविण्यात येत असलेले विद्यार्थी गुणवत्ता तसेच शाळेची पटसंख्या वाढीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचचे कौतुक करत बांदा शाळा ही आदर्शवत हे असल्याचे मत व्यक्त केले.या कमिटीत सातारा जिल्हा परिषद येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम जयश्री शिंगाडे, श्रीम सुजाता जाधव‌, श्रीम जयश्री गुरव‌, श्री शशिकांत लोटेकर‌‌, श्री राजेंद्र शिंदे, केंद्र प्रमुख श्री संजय सातपुते,दादाजी बागुल‌, सुरेश भरकुंडे, मारूती पाटील, उध्दव भस्मे, राजन देशमुख, कृष्णात बागल, रमेश मगर, छाया कदम, सुनंदा पवार, सुनिता शेडगे आदि उपस्थित होते.या समितीचे स्वागत बांदा केंद्र मुख्याध्यापक शांताराम असनकर ,केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिध्दये, सदस्य हेमंत मोर्ये, तसेच विलवडे सरपंच प्रकाश दळवी आदि मान्यवरांच्या हस्ते कमिटीचे स्वागत करण्यात आले. या कमिटीला शाळेतील उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा