झरेबांबर येथे भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
दोडामार्ग
झरेबांबर तिठा येथे आज दुपारच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोने धडक देत कु.श्रेया संदीप गवस या मांगेली येथील ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे या सात वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ती रस्ता ओलांडत असताना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झरेबांबर तिठा येथे ही घटना घडली. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे तिचे नाव आहे. तिला अधिक उपचारासाठी तिथून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुरतीचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे संबंधित टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी जमावाकडून करून करण्यात आली आहे.
श्रेया ही काल झरेबांबर येथे आपल्या मामाकडे जत्रेसाठी आपल्या आईसह आली होती. आज ती घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.