You are currently viewing अर्थार्थ जीवनाचा

अर्थार्थ जीवनाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अर्थार्थ जीवनाचा*

*****************

काळच इतुका सहजी लोटूनी गेला

आठव ते सारे भासते धुरकटलेले

श्वासातले स्मृतीगंध जाहले विकलांग

प्रीतभाव निष्पाप अंतरीचेच सुकलेले….

 

हा शाप अश्राप जीवास कसा लागला

आज कलीयुगात कळेनासेच जाहले

वात्सल्यमयी ऋणानुबंध जरी प्रारब्धी

तरीही आज कां ? भावबंध दुरावलेले….

 

निष्पाप प्रीतभावनांच्या रिक्त ओंजळी

जीणेच जणु जीर्ण वस्त्ररेशमी विरलेले

अर्थार्थ अशा जीवनाचा कसा उमगावा

आज कलीयुगात कळेनासेच जाहले….

 

मायाममता जिव्हाळा आज नुरला कुठे

आभाळ भावनांचेच मोकळे मोकळे

श्वासातले स्मृतिगंध जाहले विकलांग

प्रीतभाव निष्पाप अंतरीचेच सुकलेले….

*****************************

*रचना क्र. १९३

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞(9766544908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा