*बांदा केंद्र शाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा*
*बांदा*
दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी बांदा येथील पी एम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ उपशिक्षिका रसिका मालवणकर,स्नेहा घाडी,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर यांनी सहकार्य केले.
*स्पर्धात्मक उपक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करताना*