You are currently viewing अखिल भारतीय गाबीत महासंघाकडून अपघातग्रस्त बांदेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द

अखिल भारतीय गाबीत महासंघाकडून अपघातग्रस्त बांदेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द

देवगड :

दिनांक 8 जुलै 2023 रोजी देवगड – वानिवडे एसटी बस चालकाने बेदरकार वाहन चालवून अपघात केल्यामुळे देवगड आनंदवाडी येथील तरुण युवक कु.तेजस तुषार बांदेकर याचा मृत्यू झाला होता आणि सोबत असलेला त्याचा धाकटा भाऊ कु.तन्मय तुषार बांदेकर हा गंभीर जखमी झाला होता.

या प्रसंगामुळे घरातील कर्ता सवरता गेल्याने गाबित समाजातील या गरीब कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिल नसल्याने त्यांची आई किरकोळ मासे विक्री करून सद्यःस्थितीत प्रपंच चालवते आहे.

अशा परिस्थितीमध्ये अखिल भारतीय गाबीत महासंघातर्फे महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार श्री.परशुराम उपरकर यांचे हस्ते आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.यावेळी त्यांचे समवेत महासंघाचे खजिनदार श्री.नारायण आडकर,गाबीत समाज सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर,देवगड तालुकाध्यक्ष श्री.संजय पराडकर,सचिव श्री संजय बांदेकर,उपाध्यक्ष श्री. लक्षुमण तारी, बाळ मुणगेकर,सुहास पराडकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा