कणकवली तालुक्यात ७८.३१ टक्के मतदान…

कणकवली तालुक्यात ७८.३१ टक्के मतदान…

तोंडवली – बावशीत ८० .८२ टक्के तर भिरवंडेत ७४.८६ टक्के मतदान…

कणकवली

तालुक्यात आज दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७८.३१ % मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तोंडवली – बावशी आणि भिरवंडे ग्रामपंचायत साठी ७ मतदानकेंद्रांवर २ हजार १०७ मतदारांपैकी एकूण १ हजार ६५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
भिरवंडे ग्रा.पं.च्या ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ३ जागांसाठी ८८७ मतदारांपैकी एकूण ६६४ मतदारांनी मतदान केले. भिरवंडेत ७४.८६ % मतदान झाले. तर तोंडवली – बावशी ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १ हजार २२० पैकी ९८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तोंडवली – बावशी मध्ये ८०.८२ % मतदान झाले. गांधीनगर ग्रा पं. च्या ७ ही जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा