You are currently viewing “फेंगल” वादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पावसाच्या तुरळक सरी…

“फेंगल” वादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पावसाच्या तुरळक सरी…

“फेंगल” वादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पावसाच्या तुरळक सरी…

सावंतवाडी

“फेंगल” वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. काल रात्री उशिरा पासून पावसाने बरसण्यास सुरवात केली. विषेश म्हणजे वातावरणात दमट असल्यामुळे अचानक थंडी गायब झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रशासनाकडुन “यलो अलर्ट” जाहीर करण्यात आला आहे.

येत्या काळात हलक्या व मध्यम पावसाचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे अचानक पाऊस कोसळणार असल्यामुळे याचा फटका आंबा व काजू पिकाला बसण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा