You are currently viewing तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर…

तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर…

वैभववाडी

तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी तहसीलदार वैभववाडी रामदास झळके यांच्या उपस्थितीत छोट्या मुलाने सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामध्ये 18 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत तर सोळा ग्रामपंचायतींवर पुरुष सरपंच विराजमान होणार आहेत वैभववाडी तालुक्यात महिलराज पुढील पाच वर्षासाठी येणार आहे. तालुक्यातील तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले .यामध्ये हेत व सोनाळी ग्रामपंचायतीवर अनुसूचित जातीच्या महिलासाठी सरपंच पद आरक्षित झाले आहे. तर एडगाव – वायंबोशी ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जात प्रवर्गातील पुरुष पदासाठी आरक्षित झाले आहे. सोनाली ग्रामपंचायत आरक्षण हे अनुसूचित जाती तिच्या महिला प्रवर्गासाठी जाहीर आहे.मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सोनाळी ग्रामपंचाय प्रवर्गासाठी अनुसूचित महिला आरक्षण नसल्याने सोनाली ग्रामपंचायत अनुसूचित महिला सरपंच हे पद रिक्त राहणार आहे. वैभववाडी तालुक्यातील 9 ग्रामपंचायती नागरिकाचा मागास प्रवर्ग सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून 5 ग्रामपंचायतीवर महिला सरपंच तर 4 ग्रामपंचायतीवर पुरुष सरपंच पदाची सोडत काढण्यात आली. यामध्ये वेंगसर – महिला, नर्ले – महिला,तिरवडे तर्फ सौंदळ – महिला,कुर्ली – महिला,गडमठ महिला,नापणे – पुरुष ,लोरे – पुरुष,निम – अरुळे-पुरुष,कुंभवडे – पुरुष सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून 22 ग्रामपंचायतीमधून 11 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला सारपंच सोडत पद्धतीने आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले.यामध्ये नानिवडे – सर्वसाधारण महिला,नाधवडे – सर्वसाधारण महिला, जांभवडे सर्वसाधारण महिला, ऐनारी – सर्वसाधारण महिला, तिथवली – सर्वसाधारण महिला, सांगुळवाडी – सर्वसाधारण महिला,उंबर्डे – सर्वसाधारण महिला,नावळे – सर्वसाधारण महिला,खांबाळे- सर्वसाधारण महिला,अरुळे- सर्वसाधारण महिला,उपळे – सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आला आहे.तर सर्वसाधारण प्रवर्गातून सरपंच पदासाठी पुढील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोळपे, भुईबावडा, सडूरे – शिराळे, कोकिसरे ,कुसुर, मौदे, अचिरणे,तिरवडे तर्फ खारेपाटण, आखवणे, मांगवली ,करूळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यावेळी वैभववाडी तहसीलदार रामदास शेळके, नायब तहसीलदार अशोक नाईक, मंडल अधिकारी प्रमोद पिळणकर ,अव्वल कारकून ए.के. जाधव, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती तारी,लिपिक श्रीमती मांजरेकर तसेच नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नंदू शिंदे, रमेश तावडे, अनिल नराम, दीपक पाचकूडे, अंबाजी हुंबे, सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 17 =