You are currently viewing भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ६ आपदग्रस्त कुटुंबीयांना मदत

भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ६ आपदग्रस्त कुटुंबीयांना मदत

समानवता ट्रस्टचाही मदतीचा हात

कुडाळ :

भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सहा आपदग्रस्त कुटूंबियांना मदत देण्यात आली. पुराचे पाणी घरात घुसल्याने सहा कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यांना अन्न धान्य पुरविण्यात आले. समानवता ट्रस्ट यांच्या माध्यमातून रोख स्वरूपात तही मदत देण्यात आली.
यावेळी भाजपा घावनळे विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे, वाडोस सरपंच सौ. संजना म्हाडगुत, उपसरपंच संजय म्हाडगुत, समानवता ट्रस्ट चे सदस्य तायशेटे, वाडोस बूथ अध्यक्ष सत्यवान म्हाडगुत, प्रविण म्हाडगुत, संदीप म्हाडगुत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 10 =