एक महिना उलटूनही तिलारी घाटातून एसटी बसेस बंद..
प्रविण गवस यांनी वाहतूक विभाग नियंत्रक, कोल्हापूर यांच्याकडे एसटी बसेस सुरू करण्यासंदर्भात निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा
दोडामार्ग
गेले अनेक महिने दोडामार्ग तालुक्यातून कोल्हापूर मार्गे येणाऱ्या एस टी बसेस बंद आहेत,सदर तिलारी घाटातून अवजड वाहातुकीस ३१ ऑक्टोंबर पर्यंत निर्बंध होते, मात्र आता त्यांनतर एक महिना उलटूनही एस टी बसेस सुरु झाल्या नाहीत, यासाठी याअगोदर आंदोलनही झाले मात्र अजूनही एस टी बसेस तिराळी घाट मार्गे सुरु झाल्या नाहीत, यामुळे प्रवासी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांचे हाल होतं आहेत, सदरची वाहतूक ही कोल्हापूर आगारा मार्फत होते यासाठी त्यांनी योग्य पावले उचलावीत व वाहातूक सूरु करावी असे निवेदनाद्वारे आवाहन स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण यांनी वाहतूक विभाग नियंत्रक कोल्हापूर यांच्याकडे केले आहे, यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई उपस्थित होते. सदर निवेदनात त्यांनी लवकरच एस टी बसेस सुरु न झाल्यास उपोषणासारखा आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेलच असे म्हटले आहे.