You are currently viewing भ्रमणध्वनी (मोबाईल)…

भ्रमणध्वनी (मोबाईल)…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भ्रमणध्वनी (मोबाईल)…*

 

खेडी असो वा शहरं

झाली पार सुनीसुनी

जो तो बसला हाताशी

घेऊन भ्रमणध्वनी ।। १ ।।

 

झाला मोबाईल जसा

जीवप्राण माणसाचा

कसा पडता हाताशी

कोण उरतो कुणाचा ।। २ ।।

 

नाही राहिली अंगाई

गाई-गाईची ती गाणी

बाळ झोपण्याच्या आधी

मागते भ्रमणध्वनी ।। ३ ।।

 

झाले अतीतात गार

जीवलग सवंगडी

कसा सगा मोबाईल

गेली नात्यांनाही तडी ।। ४ ।।

 

ग्रंथ पुस्तके तयांना

कोण वाचण्या तयार

मोबाईलमुळे जशी

झाली कपाटी-भंगार ।। ५ ।।

 

दिसे मोबाईल आता

जनी बनला विशेष

ग्रंथ वाचन-लिखाण

कसे उरले ना शेष ।। ६ ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा