You are currently viewing विठ्ठल नामाचा व्यापार

विठ्ठल नामाचा व्यापार

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना

बरं खरं हाय काय
तूच सांग पांडुरंगा
काही विकून रे खाती
तुका,नामाच्या अभंगा !!

तुकोबांनी केली तुझ्या
नामाचा रे व्यवहार
कालियुगी बा विठ्ठला
होतो तुझाच व्यापार !!

ध्यान साधनेचे फळ
झाला विठ्ठल पावन
लिही रोज रोज गाथा
तुका एक एक पान !!

संते रचिले अभंग
सेवा अर्पिली रे लोका
नाही घेतला रे कधी
कुणा कडून रे पैका !!

देवा इहलोकी आता
हाहाकार रे माजला
देवा तुझा देवदूत
संत धनलोभी झाला !!

भोंदू महाराज बाबा
काय वर्णू थाटमाट
धन सुखात लोळती
मुखा पक्वान्नाचे ताट !!

संत संग कीर्तनाचा
आज ठरतो रे भाव
तूच सांग देवा कैसा
ठेऊ चरणी रे भाव !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा