घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे सूचना
सावंतवाडी
केंद्रशासनाने घनकचरा व्यवस्थापना संदर्भात अधिसूचना जाहीर केली असून त्या संदर्भातील नियमांची नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर अशी दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सूचना नगरपरिषद प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
केंद्र शासनाने अधिसूचना क्र. एसओ १३५७ (ई) दि. ०८/०४/२०१६ अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी शहरामध्ये प्रभावीपणे चालू आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदीचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थाना दड करण्याचे अधिकारी (Spot Fine) नगरपरिषदेला शासन निर्णय क्र. स्वमअ-२०१७/प्र.प्र. २५६ (१)/ नवि- ३४ / नगरविकास विभाग / महाराष्ट्र शासन दि. ७ सप्टेंबर २०१८ अन्वये प्रदान करण्यात आले आहेत.
त्यास अनुसरून या सावंतवाडी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे अनुपालन न करणान्या व्यक्ती संस्थांकडून खालीलप्रमाणे दंडनीय रक्कम वसूल करण्यात येत आहे.
रस्ते मार्गावर घाण करणे
रुपये १५० दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे रुपये १०० दंड,
उघड्यावर लघवी करणे किंवा लघुशंका करणे रुपये १०० दंड,
उघड्यावर शौच करणे रुपये ५०० दंड आकारण्यात येणार आहे.
तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घेऊन घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.