You are currently viewing पशुसंवर्धन विभागामार्फत 21 व्या पशुगणनेस सुरुवात 

पशुसंवर्धन विभागामार्फत 21 व्या पशुगणनेस सुरुवात 

पशुसंवर्धन विभागामार्फत 21 व्या पशुगणनेस सुरुवात 

प्रगणकांना पशुपालकांनी सहकार्य करावे

–        जिल्हाधिकारी अनिल पाटील

 

        सिंधुदुर्गनगरी

पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षींनी पशुगणना केली जाते. या अंतर्गत 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस 25 नोव्हेंबर 2024 पासून  प्रारंभ होत असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुटपक्षी आदी प्रजातीच्या जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे.

ग्रामीण भागासाठी 87 आणि शहरी भागासाठी 9 असे एकूण 96 पशुगणनेसाठी प्रगणक तर ग्रामीण भागासाठी 16 आणि शहरी भागासाठी 1 असे एकूण 17  पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रगणकांद्यारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनांसाठी महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी जनावराची अचुक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.सी. बलोलीकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी. ठाकूर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा