शिवसेनेच्या सरचिटणीस पदी अमरसिंह राणे ,उपतालुका प्रमुख पदी सुभाष पांगम तर सहसचिवपदी आनंद नाईक यांची नियुक्ती
दोडामार्ग
महायुतीला जिल्ह्यात मोठे यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी तालुका सरचिटणीसपदी अमरसिंह राणे, सहसचिवपदी आनंद नाईक तर सुभाष उर्फ बबलू पांगम यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या सहीने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.