*52 वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 28 व 29 नोव्हेंबर 2024 रोजी*
आंबोली- शिक्षण विभाग पंचायत समिती सावंतवाडी व सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विसमेन असोसिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली तालुका सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 20 24 रोजी सकाळी 9.00 ते 5.00 वा. या कालावधीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा असून या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती सादर करणार आहेत. तसेच प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्याही विज्ञान प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. सलग दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटांमधून विद्यार्थी प्रतिकृती, शिक्षक प्रतिकृती, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर प्रतिकृती यांच्या प्रतिकृतीं ची मांडणी व परीक्षण होणार असून सदर विज्ञान प्रदर्शनात निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत .शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार असून त्यानंतर होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभामध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे
तरी तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा . तसेच हे विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विज्ञान प्रेमी यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी, श्रीमती कल्पना बोडके व सैनिक स्कूल प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी केले आहे.