You are currently viewing “जिजाऊ या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न”

“जिजाऊ या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न”

मा.निलेशजी सांबरे संस्थापक अध्यक्ष असलेल्या जिजाऊ ही सामाजिक संस्था गेली सुमारे पंधरा वर्षाहून जास्त काळ कोकणात आरोग्य, शिक्षण,पर्यावरण, रोजगार आणि महिला सबलीकरणामध्ये लक्षवेधी काम करत असून कोरोनापूर्वी ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषतः ग्रामीण भागातील शाळामधून सुमारे पन्नास लाखाहून जास्त वह्यांचे वाटप करण्यात आले. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिड लाखापेक्षा जास्त वह्या वाटण्यात आल्या. कोरोनाचे अचानक संकट आल्याने वह्या वाटपाच काम थांबल..त्यामुळे पुन्हा काही शाळांना वह्या देण्याचा उपक्रम सर्व नियम काटेकोरपणे पाळून सुरु केले..आणि राहिलेल्या वह्यांचे वितरणही झाले. याचाच एक भाग म्हणून आज सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूलला एक हजार वह्या देण्यात आल्या. प्रातिनिधिक स्वरूपात फक्त दहा विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले.
या शैक्षणिक उपक्रमास सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.शैलैश प.ई, शाळेचे जेष्ठ माजी विद्यार्थी मा.दत्तप्रसाद गोठोस्कर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. प्रसाद नार्वेकर, अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक मा.मानकर, शिक्षकवर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमात मलाही सहभागी होता आलं तसेच जिजाऊ परिवाराचा एक सदस्य म्हणून जिल्ह्यात असे समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे भाग्य मला लाभलं..

..थँक्स टू जिजाऊ.. थँक्स टू मा सांबरेसाहेब…..
… अँड.नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − one =