You are currently viewing भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने स्त्री रोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार..

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने स्त्री रोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार..

सावंतवाडी

राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडी यांच्या माध्यमातून सावंतवाडीकरांचे देवमाणूस तथा स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार करण्यात आला. स्त्रीरोगतज्ञ म्हणून तब्बल 33 वर्षांच्या जनसेवेनंतर ते नुकतेच निवृत्त झाले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी 23 वर्ष सेवा बजावली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा गौरव भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या माध्यमातून केला गेला. अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष विकास सावंत यांसह संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष विकास सावंत, बाळासाहेब बोर्डेकर, उमाकांत वारंग, सी.एल.नाईक, गितेश पोकळे, समीर वंजारी, अमोल सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, प्राचार्य विकास कठाणे,डॉ. दीपक तुपकर, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. ललित विठलानी विनायक गावस आदी उपस्थित होते.

भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडी यांच्या माध्यमातून सावंतवाडीकरांचे देवमाणूस तथा स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार करण्यात आला. कॉलेजच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष विकास सावंत म्हणाले, प्रसुतीवेळी स्त्रीचा पुनर्जन्म होतो. गेल्या ३३ वर्षांत हे कार्य एकही डाग लागू न देता डॉ. दुर्भाटकर यांनी केल. त्यांनी मनात आणलं असतं तर आज घरावर सोन्याची कवल घालू शकले असते. पण त्यांनी तसं न करता सेवाभावी वृत्तीने काम केलं. ते निवृत्त झाले असले तरी त्यांच्यातील डॉक्टर अखेरपर्यंत कायम राहील.

डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सावंतवाडीकरांसाठी देवमाणूस होते. त्यांनी निस्वार्थी पणे उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत असताना असंख्य महिलांना पुनर्जन्म दिला. सरकारी रूग्णालयातील डॉक्टर म्हणून कार्यरत असताना लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळेच त्यांच्याकडून उपचार घेण्यासाठी अनेक रूग्ण सावंतवाडीत येत असत. डॉॅक्टर निवृत्त झाले असले तरी ते रूग्णसेवेत असणार आहेत.‌ आजवरच्या कारकिर्दीतील डॉक्टरांनी दिलेली सेवा सावंतवाडीकरांच्या स्मरणात राहील असं मत अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे संचालक उमाकांत वारंग माजी प्राचार्य
बाबासाहेब पाटील संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब बोर्डेकर यांनी डॉ दुर्भाटकर यांच्या विषयी आपले अनुभव कथन केले दुर्भाटकर यांचीही सेकंड इनिंग सुरू झाली असून ते कधीच रिटायर होणार नाहीत आयुष्यभर ते डॉक्टर्स म्हणूनच सेवा बजावतील अनेकांना आई होण्याचे भाग्य त्यांनी दिले तर अनेकांना पुनर्जन्म दिला अशा शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या डॉ. दुर्भाटकर यांनी सत्काराला उत्तर देताना संस्था व कॉलेजचे आभार मानले. जनतेच्या प्रेमामुळेच आपण हे कार्य करू शकलो अस ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रजननाने आणि धन्वंतरी पूजनाने झाली

प्रतिक्रिया व्यक्त करा