You are currently viewing जगातील सर्वात मोठे कोरोना लसीकरण अभियान १६ जानेवारीला 

जगातील सर्वात मोठे कोरोना लसीकरण अभियान १६ जानेवारीला 

जगातील सर्वात मोठे कोरोना लसीकरण अभियान १६ जानेवारीला 

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अभियानाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने १६ जानेवारीला कोरोना लसीकरण अभियानाला भारतात सुरुवात करतील. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान असेल. यात संपूर्ण देश कव्हर होईल. यावेळी सर्व राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण ३००६ लसीकरण केंद्रे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांशी जोडले जातील. एवढेच नाही, तर या सर्व ठिकाणी साधारणपणे एकाच वेळी लशी टोचल्या जातील. उद्घाटनाच्या दिवशी प्रत्येक सेंटरवर १०० लाभार्थ्यांना लस टोचली जाईल.

हा लसीकरण कार्यक्रम आरोग्य सेवांशी संबंधित फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यासाठी असेल. हा कार्यक्रम विशेषत्वाने, सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांतील फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी चालवला जात आहे. लसीकरण कार्यक्रमात को-विनचाही वापर केला जाईल. हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला एक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. याच्या सहाय्याने डोस स्टॉक, स्टोरेज तापमान आणि कोरोना लशीसाठी लाभार्थ्यांच्या व्यक्तिगत ट्रँिकगचा प्रत्यक्ष वेळ, यांसंदर्भात माहिती मिळेल. एवढेच नाही, तर हा डिजिटल प्लेटफॉर्म लसीकरण सत्रांच्या आयोजनाबरोबरच सर्व स्थरांवर कार्यक्रम व्यवस्थापनाला मदत करेल.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा