You are currently viewing गणेश सजावट स्पर्धेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश…

गणेश सजावट स्पर्धेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश…

गणेश सजावट स्पर्धेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश…

सावंतवाडी पालिकेचा पुढाकार; सजावटीसह रिल्स व चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी

येथील नगर परिषदेच्या माध्यमातून वसुंधरा अभियाना अंतर्गत सावंतवाडीचो लाडको इको फ्रेंडली बाप्पा गणेश सजावट ,रिल्स आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन संबंधित कलाकार व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे.

यातील गणेश सजावट स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम क्रमांक ५ हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार, तृतीय क्रमांक २ हजार आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीस आहे तर रिल्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ५ हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार, तृतीय क्रमांक २ हजार तर चित्रकला स्पर्धेसाठी बक्षीस आणि ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होवो इच्छिणाऱ्या संघांनी नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा