You are currently viewing शॉटगन नेमबाजी स्पर्धेत ॲड. भांगले यांना रौप्य पदक

शॉटगन नेमबाजी स्पर्धेत ॲड. भांगले यांना रौप्य पदक

शॉटगन नेमबाजी स्पर्धेत ॲड. भांगले यांना रौप्य पदक

सिंधुदुर्ग

ऑल गोवा राज्य शॉटगन शूटिंग चॅ म्पियनशिप स्पर्धेत अॅड. विक्रम भांगले यांनी टॅप मास्टर प्रकारात लक्षाचा अचूक वेध घेत रौप्य पदक पटकावले, पेरनेम गोवा येथील यश शूटिंग शॉटगन रेंजवर ही स्पर्धा झाली.सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले अॅ ड. विक्रम भांगले हे सुप्रिम कोर्टातील आपल्या वकिली बरोबरच, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी असून ते भारताच्या राष्ट्रीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक
म्हणूनही राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्यांनी वर्ल्डकप, एशियन गेम, कॉमनवेल्थ गेम या सारख्या अनेक स्पर्धांमध्ये काम पाहिले आहे. पंच आणि प्रशिक्षक या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा खेळाडू म्हणून आपले कौशल्य आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाचा एक भाग म्हणून त्यांनी गोवा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेत पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदकाला गवसणी घातली. अॅड. भांगले यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा