You are currently viewing भिरवंडे गावातील विकास कामांचा सिलसिला सुरू 

भिरवंडे गावातील विकास कामांचा सिलसिला सुरू 

भिरवंडे गावातील विकास कामांचा सिलसिला सुरू

कनेडी // वार्ताहर –

भिरवंडे गावातील विकास कामांचा सिलसिला अजूनही चालूच असून विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोट्या सावंत यांनी आपण भिरवंडे वासियांना दिलेल देऊ तो शब्द पुरा करू असे सांगितले होते त्या प्रमाणे कामे करण्यात आली आहेत यामध्ये भिरवंडे रामेश्वर मंदिर ते जांभूळ भाटले डांबरीकरण करणे, 80 लाख, जांभूळ भाटले गणेश घाट बांधणे 2.50 लाख आणि जांभूळ भाटले पायवाटेवर मोरी बांधणे 2.50 लाख या कामांचा शुभारंभ माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, शिवसेना उप जिल्हा प्रमुख महेंद्र सावंत, उप तालुका प्रमुख सुनील सावंत,माजी सरपंच मिलिंद सावंत पत्रकार विनय सावंत,श्रीकांत सावंत, आबा मराठे, सुरेशचंद्र सावंत, तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा