You are currently viewing लिंगायत समाजाच्या महत्वाच्या कामांना प्राधान्य देणार – समीर नलावडे

लिंगायत समाजाच्या महत्वाच्या कामांना प्राधान्य देणार – समीर नलावडे

कणकवली

शहरातील लिंगायत समाज बांधव हे नेहमीच आपल्या पाठीशी राहिले आहेत.यामुळे प्रथम नागरिक या नात्याने रखडलेली विकास कामे मार्गी लावणार असून लिंगायत समाजाच्या महत्वाच्या कामांना प्राधान्य देत कामे मार्गी लावण्याचे अश्वासन समीर नलावडे यांनी दिले.

कणकवली न.पं. दालनात लिंगायत समाजबांधव व नगराध्यक्ष तसेच नगरसेव यांच्यात विकासकामाबाबत बैठक पार पडली.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,नगरसेवक अभिजित मुसळे,राजू गवाणकर,समाजाचे अध्यक्ष श्रीरंग परगावकर, दीपक टकले, राजू सरूडकर,
श्री.आदमाणे, नागेश परगावकर, अजित नष्टे, सचिन टोनेमारे, अमित टकले, अमोल टकले, मिथुन मिठारे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष म्हणाले, टेंबवाडी ते लिंगायत समाज स्मशानभूमीकडे जाणाऱ्या 12 मीटर रस्त्याचे काम मार्गी लागणार असून त्याबाबत संबंधित जमीन मालकांनी समंत्ती पत्र देखील दिले आहे.काही महिन्यात ह्याचे खडीकरण करणार असल्याचे सांगितले. तसेच रिंगरोड रस्त्याचे ही काम होणार असून गणपती साना पर्यंतचा रस्ता करण्याचा मानस आहे.तर टेंबवाडी ते लिंगायत स्मशानभूमी रस्त्याचा कायमचा प्रश्न मिटला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान उपस्थित समाज बांधवांनी लिंगायत स्मशान मंदिर येथे मिनी हायमास्ट, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर तसेच उर्वरित कम्पाउंड भिंत तसेच इतर कामाबाबत चर्चा केली.मात्र सध्या कोरोना काळात विकास निधीची अडचण असून येत्या वर्षभरात ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन श्री.नलावडे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा