सिंधुदुर्गात हौशी क्रिकेट क्लबची स्थापना…

सिंधुदुर्गात हौशी क्रिकेट क्लबची स्थापना…

मालवणात 17 जानेवारीला जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा..

मालवण :

सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली आहे. 17 जानेवारीला मालवण येथे जिल्हास्तरीय 45 वर्षावरील माजी क्रिकेटपटूंचे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सावंतवाडी संघाची निवड झाली.

सावंतवाडी शहरातील क्रिकेटपटू आनंद आळवे यांच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी हौशी क्रिकेट क्लब सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ क्रिकेटपटू आनंद आळवे, राजन नाईक, शरद शिरोडकर, सुनील भांबुरे, बाळा मडगावकर, प्रशांत बांदेकर, अजय नाईक, बाळा गाड, वासू बांदेकर, राजू डोंगरे, दया आळवे, समीर आगा, महेश भाट, उमेश तानावडे, दत्ता कल्याणकर, अजित सावंत, समीर येडवे, अजित नाईक, अभय भिसे, विद्या देसाई, प्रवीण शिर्के, संदीप कांदे, राहुल रेगे, महेश देऊळकर, सुधीर नाईक, संजू बिर्नोडकर, संतोष चव्हाण, रघु धारणकर आदी उपस्थित होते.

कणकवलीतील अनिल हळदीवे हे क्रीडा क्षेत्रात अनेक वर्ष काम करतात. त्यांनी शरद शिरोडकर यांच्याशी संपर्क साधून सिंधुदुर्गातील ज्येष्ठ क्रिकेटपटूंना एकत्र आणले आणि जिल्ह्यात पहिली सावंतवाडी हौशी क्रिकेट क्लब संघटना उदयास आली. 17 जानेवारीला मालवण येथील बोर्डिंग मैदानावर या वर्षीची पहिली स्पर्धा होणार आहे. या वर्षीचे यजमानपद मालवणला मिळाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा