You are currently viewing सिंधुदुर्गात चर्चा फक्त “कोणी किती पैसे वाटले..?”*

सिंधुदुर्गात चर्चा फक्त “कोणी किती पैसे वाटले..?”*

*सिंधुदुर्गात चर्चा फक्त “कोणी किती पैसे वाटले..?”

*पैशांच्या वर्षावात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली*

विशेष संपादकीय…..

कोकणी म्हणजे बाहेरून नारळा सारखी कडक अन् आतून शहाळ्यासारखी गोड साधी भोळी माणसे..! परंतु कोकणाची हीच साधी भोळी माणसे आज पैशाच्या हव्यासापोटी भरकटलेली दिसत असून “जिल्ह्याचा विकास कोण करणार..?” हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला नसून “कोण किती पैसे वाटतो..?” याचाच ध्यास लागलेला दिसून आला आहे. “मत दान” या शब्दाचा अर्थच आजच्या राजकीय समीकरणांमध्ये बदलला असून नेत्यांनी जनतेची नाडी ओळखली आणि मतदार विकत घेण्याकडे कल वाढलेला आहे. मतदार विकले जात असल्याने आत्मविश्वास दुणावलेले नेते निवडणूक पूर्व पेढे वाटून आनंद व्यक्त करताना देखील दिसत आहेत. त्यामुळे आजकालची निवडणूक म्हणजे केवळ “नोट फॉर वोट” अशाच विनाशकारी गर्तेत अडकलेली पाहायला मिळत असून भविष्यात ज्याच्याकडे पैसा तोच सरदार बनणार असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे.
*मत मिळविण्यासाठी का वाटावे लागतात पैसे..?*
एकीकडे विकासाच्या नावाने बोंब सुरू असून विकास फक्त कागदावर आणि सोशल मीडिया, पेपर, दूरदर्शनच्या जाहिरातींमध्ये उरला असल्याने रस्ते, पाणी, वीज, महागाई आदी समस्यांनी नागरिक त्रस्त झाला आहे. या सर्व समस्यांकडे जर दुर्लक्ष करायचा असेल तर जनतेला आमिष देण्याशिवाय नेतेमंडळींकडे कोणताही दुसरा पर्याय नसतो. अशावेळी निवडणुकीच्या आधी फक्त दोन दिवस कष्ट घेऊन जिंकण्यासाठी लागणारी मते वाटेल तेवढे पैसे देऊन विकत घ्यायची हा ट्रेण्ड वाढत चालला. त्यामुळे “सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता” मिळविणे हेच एकमेव ध्येय नजरेसमोर ठेऊन नेतेमंडळी जनतेच्या प्राथमिक गरजा बाजूला सारून मदारी माकड नाचवतो तसे नेतेमंडळी पैशांच्या जोरावर जनतेला नाचवत असून कोकणची साधी भोळी जनता कधी पैशांच्या तर कधी घरातील सुख सोयी, पर्यटन स्थळी सहली आदी आमिषांना बळी पडून भरकटते आहे. प्रत्येक मताला १०००/-, २०००/- असा भाव लागला असून बाजारात कोंबडी विकली जातात तशी माणसे विकली जात आहेत. कुत्रे, मांजर, गुरेढोरे सुद्धा यापेक्षा महाग दराने विकली जातात ही विकल्या जाणाऱ्या मतदारांसाठी शरमेची बाब आहे. आज लोक निवडणुका पार पडताच निवडणुकीत स्वतःची विक्री करून मिळालेल्या पैशांतून मोठ मोठ्या चारचाकी मोटारीने देवदर्शन करायला शिर्डी, अक्कलकोट, पंढरपूर आदी ठिकाणी दौरे काढताहेत परंतु “हे मतदारा…तो ईश्वर तरी तुझं विकलं गेलेलं इमान पाहून तुला दर्शन देईल का..?” हा प्रश्न तुला कसा काय पडत नाही..? असा प्रश्न आज लोकांना बेइज्जत होऊन फिरतीचे, हिल्स स्टेशन, देवदर्शन आदी दौरे काढलेले पाहून सजग नागरिकाला पडला आहे. नेत्यांनी कुमार्गाने कमावलेला काळा पैसा घेऊन त्या काळ्या पैशातून उटी, म्हैसूर, बेंगलोर अशा थंड हवेच्या ठिकाणी सहलीवर जाणे म्हणजे आपले इमान दुसऱ्याच्या पायी तुडवणे.. हे जोपर्यंत जनता समजणार नाही तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होणार नाही आणि दुर्दैवाने विकास झाला नाही म्हणून विकला गेलेला मतदार बोंब सुद्धा मारू शकणार नाही हे सुद्धा त्रिवार सत्य आहे.
प्रत्येक पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मतदारांची गणना “ए बी सी” अशी करून मतदारांची लायकी काय आहे हे दाखवले होते. पैसे घेणारे मतदार आपण काहीतरी तिर मारला अशा आविर्भावात मतदान करायला जात होते. एखाद्या उमेदवारांकडून कमी पैसे मिळालेले मतदार सायंकाळ पर्यंत दुसऱ्या कोणाचे पैसे येतात ते पदरात पाडून घेत होते तर काही महाभाग स्वतः पैसे वाटप जबाबदारी असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांना फोन लावून पैशांची मागणी करून तीन चार जेवढे उमेदवार असतील त्या सर्वांकडून निर्लज्जपणे पैसे अक्षरशः ओरबाडून घेत होते. एवढी खालच्या पातळीवर मतदारांची लायकी गेल्याने कित्येकांना तोंडात बोटे घालण्याची वेळ आली. एका एका घरात सात आठ सदस्य असतील तिथे फक्त एका निवडणुकीत ५००००/- पेक्षा जास्त पैसे मिळाल्याचेही ऐकिवात आले. त्यामुळे जिल्हाभरात गावोगावी कोणी विकास केला..? भविष्यात कोण विकासाला प्राधान्य देणार..? मतदारसंघाचे भवितव्य काय…? भविष्य कोण ठरणार..? उद्या कोण निवडून येणार..? हे प्रश्न क्षुल्लक ठरले होते…
*केवळ कोणी किती पैसे वाटले…*
ही एकमेव चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगत होती.. कोणाच्या घरात किती पैसे आले… कोणी इज्जत सोडून पैसे मागितले.. कोणी आपले कर्तव्य न समजता देणेघेणे व्यवहार केला.. याचीच चर्चा रस्तोरस्ती रंगली होती…
आणि…
घरात चार चार सरकारी पगार येत असताना देखील पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांवर पैसे पोच केल्यानंतर चारचौघात गप्पा मारताना शी थू सुद्धा होताना दिसत होती…
देशात अशाचप्रकारे भविष्यात मतदान प्रक्रिया झाली तर नक्कीच… देशाची लोकशाही धोक्यात आहे हे मात्र नक्की…!

______________________________
*संवाद मीडिया*

🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया ख्रिसमस व नवीन वर्ष* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢
https://sanwadmedia.com/153707/
https://sanwadmedia.com/150359/
https://sanwadmedia.com/151709/

*डिसेंबर, जानेवारी, ‌फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात लिंक*👇
————————————————
*संवाद मीडिया*

*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा