*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम गझल*
*गझल*
वासनेच्या राक्षसाला जाळणारा पाहिजे
सोकलेली पातशाही मोडणारा पाहिजे
राजवाडे सभ्यतेचे बांधण्यासाठी इथे
विकृतांना दावणीला बांधणारा पाहिजे
गायचे का गोडवे त्या संस्कृतीचे आजही
लांडग्यांची चाल आता ठेचणारा पाहिजे
कायद्याच्या चौकटीचा धाक नाही राहिला
बंडखोरी तीच गुर्मी तोडणारा पाहिजे
माणसे ना माणसांशी सभ्यतेने वागती
मान द्यावा माणसांना सांगणारा पाहिजे
वृत्त कालगंगा
*****************”********
*©️®️डॉ.सौ. मानसी पाटील*
मुंबई