सावंतवाडी :
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. तेली यांनी आपल्या कुटुंबासह शहाबुद्दिन येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी रुजिता तेली व सुपुत्र सर्वेश तेली उपस्थित होते. सावंतवाडी शहराचे सर्वांगीण विकासासाठी येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्ता येणार आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध असेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.