You are currently viewing मकरसंक्रांती दिवशीच कुडाळ येथील रोहित कुडाळकर या युवकाचा काळाने घेतला बळी..

मकरसंक्रांती दिवशीच कुडाळ येथील रोहित कुडाळकर या युवकाचा काळाने घेतला बळी..

महाबळेश्वरहून कुडाळ येथे घरी परत असताना पहाटे साडेतीनच्या दरम्यान उत्तुर येथे हा भीषण अपघात

सिंधूदुर्ग
कुडाळ खालची कुंभारवाडी येथील युवक रोहित कुडाळकर वय 24 वर्षे याचा कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तुर येथे अपघाती मृत्यू झाल्याने कुंभारवाडीसह कुडाळ शहरात शोककळा पसरली आहे. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुडाळ येथील ओंकार मंगेश वालावलकर हे आपल्या भावाच्या मालकीची क्रेटा गाडी क्रमांक एम.एच.07 ए.जी.5166 ही गाडी घेऊन आपले मित्र रोहन कुंभार,जगन्नाथ पेडणेकर,सायल परब,रोहन कुडाळकर असे पाच जण मिळून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी फिरायला गेले होते.पर्यटन करून ते कुडाळला परत येत असताना पहाटे साडेतीनच्या दरम्यान उत्तुर येथे आले असता, गाडीचे चालक ओंकार वालावलकर यांचा गाडीवरील अचानक नियंत्रण सुटले अन् गाडी तिनदा पलटी झाली.यात रोहित रमाकांत कुडाळकर वय वर्षे 24 हा तरूण युवक जागीच ठार झाला.तर जगन्नाथ पेडणेकर गंभीर जखमी झाला असुन, त्याला गडहिग्लज येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर ओंकार वालावलकर,सायल परब व रोहन कुंभार हे किरकोळ जखमी असून,आजरा पोलिस ठाण्यात त्यांचे जाबजबाब घेण्यात येत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे राजू गंवडे, सुशिल चिंदरकर, राम राऊळ, शेखर कुंभार यांच्यासह कुडाळातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.तर मदत कार्य सुरू केले आहे.

दरम्यान या घटनेने कुंभारवाडीसह कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे.तर मृत रोहित रमाकांत कुडाळकरच्या मृतदेहावर शेवविच्छेन करून दुपार पर्यंत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.तर त्यानंतर रोहितचा मृतदेह कुडाळ येथे आणण्यात येणार आहे.तर अपघातात मृत्यू झालेला रोहित रमाकांत कुडाळकर हा कुडाळ शहरातील खालची कुंभारवाडी येथील असुन,तो आईवडीलांचा एकूलता एक मुलगा होता. तर रोहितचे वडील हे अपंग असुन, ते मोलमजुरी करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 2 =